...तर डॉक्टरांचा राज्यव्यापी संप : मार्ड

केईम रुग्णालयामध्ये पेशंटच्या नातेवाईकांनी मार्डच्या डॉक्टरांना मारहाण केली म्हणून निवासी डॉक्टरांनी संप पुकारलाय. १२ तास उलटूनही डॉक्टरांनी अजूनही संप मागे घेतला नाही. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी संप पुकारण्यात येईल, असा इशारा डॉक्टरांनी दिलाय.

Updated: Sep 26, 2015, 11:54 AM IST
...तर डॉक्टरांचा राज्यव्यापी संप : मार्ड title=

मुंबई : केईम रुग्णालयामध्ये पेशंटच्या नातेवाईकांनी मार्डच्या डॉक्टरांना मारहाण केली म्हणून निवासी डॉक्टरांनी संप पुकारलाय. १२ तास उलटूनही डॉक्टरांनी अजूनही संप मागे घेतला नाही. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी संप पुकारण्यात येईल, असा इशारा डॉक्टरांनी दिलाय.

अधिक वाचा : केईएममधील डॉक्टरांचा संप सुरुच, रुग्णांचे होतायेत हाल

डॉक्टरांचा संप दुसऱ्या दिवशी सुरु असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. अशातच मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी संप पुकारु अशा इशारा मार्डच्या डॉक्टरांनी दिलाय. तर रुग्णांनाचे हाल होत असल्याने डॉक्टरांनी लवकरात लवकर कामावर हजर व्हावे, अशी विनंती रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.

अधिक वाचा : डॉक्टरांना मारहाण केल्यानंतर केईएमचे डॉक्टर संपावर

केईएम रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत तीन डॉक्टर जखमी झालेत. यामुळं मार्डनं इथं संप पुकारल्यानं परिस्थिती आणखी चिघळली आहे. सुरक्षेबाबत ठोस उपाय केले जाणार नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा इशारा मार्डनं दिलाय. आज शनिवारी दुसऱ्या दिवशीही हा संप सुरूच आहे. मागण्यांबाबत विचार होत नसल्याने डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे डॉक्टरांअभावी रुग्णांचे हाल होत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.