मुंबई : आर्थिक निकषावर जमत नसेल तर जातीपातीवर आरक्षण द्या. त्याचवेळी अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपला खुले आव्हान दिले, हिम्मत असेल तर युती तोडा. ( संपूर्ण भाषणासाठी व्हिडिओ पाहा, बातमीच्या खाली)
युती तोडायची असेल तोडा, आम्ही डगमगणार नाही. युती तोडा सर्जिकल स्ट्राइक कशी असते ते दाखवतो, असे भाजपला उद्धव ठाकरेंचे आव्हान दिले. २५ वर्ष मित्र मानले तो अंगावर येईल असे वाटले नाही, पाठीत वार करेल असे वाटले नाही. मी मुख्यमंत्र्यांना सांगतोय की तुमचा नेता कोण ते ठरवा आणि अंगावर कोण येणार ते सांगा. विधानसभेत आपण एकाकी लढलो, समोर किती रथी महारथी होते, त्यांचा अश्वमेध शिवसेनाप्रमुखांच्या मर्दांनी महाराष्ट्रात रोखला. सगळ्यांनी कौतुक केले माझ्या नेतृत्वाचे मात्र हे तुमचे कौतुक आहे.
उरी दहशतदी हल्ल्यानंतर भारताने पाकमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्रईक केले. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाहीर अभिनंदन करतो. यापुढे जाऊन मोदीजी सर्जिकल स्ट्राईकवर थांबू नका. पाकिस्तानला नेस्तानाबुत करा. आता पाकव्याप्तच नाही तर पाकिस्तानसुद्धा जगाच्या नकाक्षावर हिंदुस्थान म्हणून ओळखला जाईल. त्याचवेळी त्यांनी इतर मुद्द्यावरुन त्यांच्यावर टीका केली. राज्यातील भाजपा सरकारवर यावेळी त्यांनी आपली तोफ डागली.
सर्जिकल स्ट्राइकचा पुरावा मागणाऱ्यांना सीमेवर पाठवा. सर्जिकल स्ट्राइकची बातमी सैन्याच्या एका जबाबदार अधिकाऱ्याने दिली होती. त्या ब्रेकींगने आपल्या जनतेचं मन भरुन आलं. पण काही सडक्या मेंदूची लोक बडबडले. रक्ताची दलाली हा शब्द सुचतोचं कसा? राहुल गांधीना बोफोर्स मधून हा शब्द सुचला का? मोदींवर टीका करताना सैन्यांवर कसा काय अविश्वास दाखविता. भारतामध्ये समस्यांचा रावण उभा आहे. तो आजही तसाचं आहे. या समस्या सोडविणारा राम हवा आहे, असे उद्धव म्हणालेत.
20:42 PM
मुंबई ही शिवसेनेची, शिवसेना ही मुंबईची आहे - उद्धव ठाकरे
20:37 PM
मुस्लीम म्हणून नको तर गरीब नागरीक म्हणून सवलती द्या - उद्धव ठाकरे
20:31 PM
अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असेल तर बदल झाला पाहिजे - उद्धव ठाकरे
20:30 PM
मुंबई : आर्थिक निकषावर जमत नसेल तर जातीपातीवर आरक्षण द्या - उद्धव ठाकरे
20:29 PM
मुंबई : इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या - उद्धव ठाकरे
20:29 PM
इतरांच्या न्यायहक्काला धक्का न लावता आरक्षण द्या - उद्धव ठाकरे
20:27 PM
समोरुन वार करा मग दाखवून देऊ सर्जिकल स्ट्राईक कसं असतं ते - उद्धव ठाकरे
20:25 PM
सर्जिकल स्ट्राईक ही पाकिस्तानची कंबर मोडणारी ब्रेकिंग न्यूज - उद्धव ठाकरे
20:25 PM
भारतीय लष्कराचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जाहीर कौतूक - उद्धव ठाकरे
20:23 PM
मुंबई :एकत्र निवडणुका घ्यायला शिवसेनेचा विरोध, घ्यायच्या असेल तर CM, PM यांनी निवडणूक प्रचारायला जायचे नाही!
20:23 PM
आर्थिक निकषावर आरक्षण द्या - उद्धव ठाकरे
20:21 PM
मुंबई:एकदा काय तो फैसला करा, पाकिस्तान बरोबर संबंध कसे ठेवायचे ते,जे अंगावर येतात त्यांना साफ करणे हे आम्हाला शिवरायांनी शिकवले - उद्धव
20:19 PM
मुंबई:रेसकोर्सची २०० एकर पेक्षा जास्त जागा आहे, रेसकोर्टवर वॉर म्युझियम बनवा लोकांना कळू द्या - उद्धव
20:10 PM
मुंबई :सर्जिकल स्ट्राइकचे कसले पुरावे मागतात. या कारवाईनंतर काही सडक्या मेंदूच्या माणसांनी, राहुल गांधीसुद्ध, रक्ताची दलाली हा शब्द कुठून शिकलायत? बोफोर्समधून? ज्यांनी याबाबत शंका उपस्थित केल्या त्यांचे मेंदू सडके आहे, त्यांच्यात भारतमातेचे रक्त नाही, त्यांच्या धमन्यात लाहोर आणि कराचीच्या गटाराचे पाणी आहे.
20:07 PM
मुंबई :मोदीजी अशी कारवाई कारवाई करा की, पाकिस्तानही हिंदुस्तान म्हणून जगाच्या पाठीवर ओळखले पाहीजे. काही दिवसांपूर्वी हवाईदलप्रमुख बोलले की लष्कराचा पूर्ण वापर केला असता की, आपण पाकिस्तानला कधीच नेस्तनाबूत केले असते.
20:06 PM
मुंबई : उद्धव यांचा भाजपला टोला, पण जे चांगले आहे त्याला चांगले म्हणणारे आम्ही आहोत, आमचे मन कोते नाही
20:05 PM
मुंबई :आपल्या सैनिकांनी पाकव्याप सीमारेषा पार करून त्यांना ठोकून काढले. याबद्दल मी सैन्याचे आणि पंतप्रधानांचे जाहीर अभिनंदन करतो - उद्धव
20:01 PM
मुंबई :२५ वर्ष मित्र मानले तो अंगावर येईल असे वाटले नाही, पाठीत वार करेल असे वाटले नाही. मी मुख्यमंत्र्यांना सांगतोय की तुमचा नेता कोण ते ठरवा आणि अंगावर कोण येणार ते सांगा - उद्धव
20:00 PM
मुंबई :विधानसभेत आपण एकाकी लढलो, समोर किती रथी महारथी होते, त्यांचा अश्वमेध शिवसेनाप्रमुखांच्या मर्दांनी महाराष्ट्रात रोखला. सगळ्यांनी कौतुक केले माझ्या नेतृत्वाचे मात्र हे तुमचे कौतुक आहे.
19:58 PM
मुंबई : युती तोडायची असेल तोडा, आम्ही डगमगणार नाही : उद्धव ठाकरे
19:58 PM
मुंबई : भाजपला उद्धव ठाकरेंचे आव्हान, युती तोडा सर्जिकल स्ट्राइक कशी असते ते दाखवतो
19:57 PM
मुंबई : पाठिमागून वार करु नका, हिम्मत असेल तर समोर या, आम्ही भिणार नाही
19:55 PM
मुंबई :आपला पन्नासावा दसरा मेळावा, ही परंपरा आपण कायम ठेवली आहे. पन्नासावा नाही तर येणारी कित्येक वर्ष ही परंपरा शिवतीर्थावर अशीच सुरू राहणार
19:53 PM
मुंबई : शिवाजी पार्कवर तुफान गर्दी
19:50 PM
मुंबई : शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला सुरुवात, उद्धव ठाकरेंची भाषणाला सुरुवात
19:34 PM
मुंबई : शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला सुरुवात, उद्धव ठाकरे व्यासपीठावर
18:52 PM
मुंबई : शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला थोड्याच वेळात सुरुवात