किती असणार पहिल्या बुलेट ट्रेनचे भाडे...

 मुंबई ते अहमदाबाद दरम्यान चालविण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे भाडे रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावित केले असून ते एसी फर्स्ट क्लासच्या दीड पट हे भाडे असणार आहे.  याची माहिती आज संसदेत देण्यात आली. 

Updated: May 4, 2016, 10:03 PM IST
किती असणार पहिल्या बुलेट ट्रेनचे भाडे... title=

मुंबई  :  मुंबई ते अहमदाबाद दरम्यान चालविण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे भाडे रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावित केले असून ते एसी फर्स्ट क्लासच्या दीड पट हे भाडे असणार आहे.  याची माहिती आज संसदेत देण्यात आली. 

आता किती आहे भाडे...

आज मुंबई ते अहमदाबाद दरम्यान दुरंतो एक्स्प्रेसच्या प्रथम श्रेणी एसीचे भाडे २२०० रुपये आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनचे तिकीट सुमारे ३३०० रुपये असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

किती अंतर आहे...

मुंबई ते अहमदाबाद हे अंतर ५०८ किलोमीटर अंतर आहे. जपानमध्ये टोकिओ ते ओसाका दरम्यान ५५० किलोमीटर अंतरासाठी तेथे सिंकनसेन ही बुलेट ट्रेन आहे. त्याचे भाडे सुमारे ८५०० रुपयांच्या आसपास आहे.. 

कोणी दिली माहिती...

रेल्वे राज्य मंत्री मनोज सिन्हा यांनी लोकसभेत एका लिखित उत्तरात ही माहिती दिली. बुलेट ट्रेनचा पहिल्यांदा अधितम  वेग ताशी ३५० किलोमीटर असणार आहे.
तसेच संचालन गती ताशी ३२० किलोमीटर असणार आहे. 

किती वेळात पार करणार अंतर 

बुलेट ट्रेन दोन्ही शहरातील हे अंतर दोन तास आणि सात मिनिटात पूर्ण करणार आहे. काही स्टेशनमध्ये थांबल्यास एकूण दोन तास ५८ मिनिटे असणार आहे. या मार्गाात एकूण १२ स्टेशन असणार आहेत. या योजनेत एकूण ९७,६३६ कोटी रूपये खर्च होणार आहे.