मुंबई : ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगणा सितारा देवी काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. 94 वर्षांच्या सितारा देवी यांचं मुंबईच्या जसलोक रुग्णालयात निधन झालं.
सितारा देवी यांचे चिरंजीव परदेशात वास्तव्यास आहे. त्यामुळे त्यांच्यावर येत्या गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सितारा देवी यांना पोटदुखीच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र मध्यरात्री उपचार सुरू असतांना त्यांचं निधन झालं.
वयाच्या 94 व्या वर्षीही सितारा देवी नृत्य करत होत्या. एवढचं नाही तर येत्या फेब्रुवारीमध्ये त्यांच्या एका नृत्याविष्काराचं आयोजनही करण्यात आलं होतं. सितारा देवी यांचा 1973 साली पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.