राष्ट्रवादीचा विजयी होणाऱ्या जागांवर डोळा?

लोकसभेसाठी जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं पद्धतशीरपणे योजना आखलीय. त्यासाठी सुरक्षित आणि विजयाची खात्री असणारेच मतदारसंघ आपल्या पारड्यात पाडून घेतले जातायत. कोकणातल्या रायगड मतदार संघावरही राष्ट्रवादीचा डोळा असल्याचे संकेत मिळतायत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 7, 2014, 08:32 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभेसाठी जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं पद्धतशीरपणे योजना आखलीय. त्यासाठी सुरक्षित आणि विजयाची खात्री असणारेच मतदारसंघ आपल्या पारड्यात पाडून घेतले जातायत. कोकणातल्या रायगड मतदार संघावरही राष्ट्रवादीचा डोळा असल्याचे संकेत मिळतायत.
संधी मिळाली तर सुनील तटकरे जनतेच्या पाठिंब्यानं दिल्लीत जाऊ शकतात. त्यांनी या मतदारसंघात चांगलं काम केल्याचं सांगत गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी रायगड मतदारसंघावर राष्ट्रवादीची पकड असल्याकडे लक्ष वेधलं.. हा मतदारसंघ जागा वाटपात राष्ट्रवादीकडे आल्यास तटकरेच उमेदवार असतील असे संकेत आर.आर.पाटील यांनी दिलेत.
लोकसभा निवडणूकीसाठी मंत्र्याचं मन वळविण्यातचं राष्ट्रवादीच्या पक्ष श्रेष्टीना नाकीनऊ आलय. माढा, शिरूर, हातकणंगले, बीड लोकसभा मतदार संघासाठी पक्षातील नेत्यांचे मन वळवतांना शरद पवाराना वारंवार बैठका घेण्याची वेळ आलीय. लोकसभासाठी आम्हीचं का? असं म्हणत राज्यातील एनसीपी नेते दिल्लीत जाण्यासाठी नाराज आहेत...
एनसीपीच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बैठकांवर बैठका होताहेत, पण काही मतदार संघाबाबत तोडगा मात्र निघतचं नाही.
मतदार संघ - सध्या चर्चेत उमेदवार
- शिरूर - दिलीप वळसे पाटील की अन्य कोणी ?
- माढा - विजयसिंह मोहिते की अन्य कोणी ?
- हातकणकले - जयंत पाटील की अन्य कोणी ?
- बीड - जयदत्त क्षीरसागर की सुरेश धस की अन्य कोणी ?
राज्यातील मंत्री दिल्लीत जायला तयार नाहीत, त्यामुळं एकमेकांची नावे घेत तुम्हीचं जा असं सांगतात. एनसीपीकडं असलेल्या महत्त्वाच्या लोकसभा मतदार संघात एनसीपीचे दिग्गज नेते आहेत पण ते दिल्लीत जायला काही तयार नाहीत. बहुतांश नेत्याना वाटतयं की आपल्याला दिल्लीत पाठवून एक प्रकारे अजित पवारांना रान मोकळं करण्याची खेळी तर नाही ना पक्षश्रेष्टीची. पण याबाबत बोलणार तरी कुणाकडे. एनसीपीचे नेते मात्र पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार अंतिम उमेदवार निर्णय ठरवतील असं म्हणत मग बसतात.
लोकसभा निवडणूकमध्ये जिंकल्यास दिल्लीत राहवं लागेल, त्यामुळं राज्यातील मंत्रीपद, सत्तेची मलिदा खायला मिळणार नाही. तसचं कदाचित राज्यात एनसीपीच्या जागा जास्त आल्या तर मुख्यमंत्री पदाचे स्वप्न ही साकार करता येईल यामुळं राज्यातील दिग्गज मंत्री दिल्लीचा तख्त नको, पण राज्यातील गादी हवीय अशी भूमिका घेतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.