फ्लॅटचे आमिष, टीव्ही अॅक्ट्रेसवर भोंदू बाबाचा बलात्कार

मुंबईतील म्हाडाचा फ्लॅट मिळवून देण्याच्या बहाण्याने एका टीव्ही अॅक्ट्रेसवर भोंदूबाबाने बलात्कार केल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या अॅक्ट्रेसकडून जवळपास 23 लाख रुपयेही उकळले आहेत, असे दिलेल्या तक्रारीत नमुद करण्यात आलेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 13, 2014, 09:31 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतील म्हाडाचा फ्लॅट मिळवून देण्याच्या बहाण्याने एका टीव्ही अॅक्ट्रेसवर भोंदूबाबाने बलात्कार केल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या अॅक्ट्रेसकडून जवळपास 23 लाख रुपयेही उकळले आहेत, असे दिलेल्या तक्रारीत नमुद करण्यात आलेत. दरम्यान, या भोंदूला अटक करण्यात आलेय.
भोंदू बाबाने पीडित टीव्ही अॅक्ट्रेसला तंत्रविद्येच्या सहाय्याने म्हाडाचा फ्लॅट मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होते. ती टीव्ही अभिनेत्री बंगाली बाबाच्या संपर्कात आल्यावर तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. कांदिवलीतील चारकोप भागात हा प्रकार घडल्याचे पुढे आले आहे.
या टीव्ही अॅक्ट्रेसने याआधी म्हाडाचा फ्लॅट मिळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिला म्हाडाचे घर काही मिळाले नाही. तीने एका मांत्रिकाची मदत घेतली. त्यावेळी या मांत्रिकाने तिला आपण फ्लॅट मिळवून देऊ असे आश्वासन दिले. यावर तिचा विश्वास बसला. यावेळी या मांत्रिकाने देवाला खूष करण्यासाठी पैसे लागतील असे सांगितले. त्यानंतर तिने जवळपास 23 लाख दिले. एक दिवस हा मात्रिक तिच्या घरी गेला असता त्यांनी या पिडीत टीव्ही अॅक्ट्रेसवर अत्याचार कऱण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने पोलीस ठाणे गाठले.
या बाबाने टीव्ही अॅक्ट्रेसला फसववले गेल्याची जाणीव झाल्यानंतर तिने तक्रार केली. इस्माईल खान या भोंदू बाबाने आजवर अनेकांना फसवलंय. त्याच्या ग्राहकांची यादीही मोठी आहे, त्यामध्येच बलात्कार झालेली ही टीव्ही अॅक्ट्रेसही आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आलेय.
म्हाडामध्ये फ्लॅट मिळवून देण्याच्या आमिषाने तब्बल 25 लाख रूपयांना गंडा घातलाच शिवाय शारीरिक शोषणही केलं. या अभिनेत्रीने म्हाडाच्या घरासाठी यापूर्वी अनेकदा अर्ज केला होता. प्रत्येकवेळी तिला निराश व्हावं लागलं. यामुळे म्हाडाच्या घरासाठी तिने पूजापाठ करायला सुरूवात केली. या पीडित टीव्ही अॅक्ट्रेसच्या कुणीतरी ओळखीच्याने तिची बाबाशी भेट घालून दिली होती, अशीही माहिती आता पुढे येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.