नऊ आमदारांचे निलंबन मागे

विरोधी पक्षातील 9 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आले आगे. विधानसभेतली कोंडी फोडण्यासाठी सरकारनं हालचाली सुरू केल्यायत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 1, 2017, 02:37 PM IST
नऊ आमदारांचे निलंबन मागे title=

मुंबई : विरोधी पक्षातील 9 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आले आगे. विधानसभेतली कोंडी फोडण्यासाठी सरकारनं हालचाली सुरू केल्यायत. 

विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचं निलंबन आज मागे घेतलं जाण्याची शक्यता होती. मात्र, 9 आमदारांचे निलंबन मागे घेतले असून 10 आमदारांचे निलंबन कायम आहे. या आमदारांचे निलंबन अधिवेश संपण्याआधीच मागे घेण्याची शक्यता आहे.

या आमदारांचे निलंबन मागे

- संग्राम थोपटे, 
- नरहरी झिरवळ, 
- दीपक चव्हाण, 
- दत्तात्रय भरणे, 
- अवधूत तटकरे, 
- डी. पी. सावंत, 
- वैभव पिचड, 
- अमित झनक, 
- अब्दुल सत्तार

आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितलेय. विरोधकांना बाहेर ठेवून विधीमंडळाचं कामकाज चालवण्यात सरकारला रस नाही. त्यामुळं सभापतींशी चर्चा करुन निलंबन मागे घेण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यानंतर आज 9 आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आले.

18 मार्चला अर्थसंकल्प मांडताना अडथळा आणणं, तसंच सभागृहाचा अवमान करणं, या कारणांवरुन 31 डिसेंबरपर्यंत या आमदारांचं निलंबन करण्यात आले.