www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
माळशेजच्या भीषण अपघातावरून गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलीस प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत. अशा भीषण अपघातांना भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणाच जबाबदार असल्याचं कबुली गृहमंत्री यांनी दिलीय.
रस्ता सुरक्षा पंधरवाड्यात तरी निम्म्यानं अपघात कमी करा अशा सूचना गृहमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसंच या पंधरवाड्यात तरी पोलिसांनी कुणापुढे हात पसरू नये.
माळशेज घाटात काल झालेल्या ट्रक आणि एसटी बसच्या अपघातग्रस्त कुटुंबीयांची आज उपमुख्यमंत्री अजित पवार आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी भेट घेतली. जुन्नर तालुक्यातल्या आहेर आणि दाते कुटुंबीयांमधल्या प्रत्येकी एका अशा दोघांना एसटी महामंडळात नोकरी दिली जाईल असं यावेळी त्यांनी जाहीर केलं.
काल माळशेज घाटात झालेल्या भीषण अपघातात २८ प्रवाशांचा बाळी गेला होता. त्यामध्ये आणे इथल्या आहेर कुटुंबातले ७ जण मृत पावलेत. तर दुपारी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सुद्धा भेट देऊन आहेर कुटुंबियाना एक लाख व दाते कुटुंबियाना २१ हजाराची मदत केली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.