malashej

माळशेज अपघाताला भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणाच जबाबदार - गृहमंत्री

माळशेजच्या भीषण अपघातावरून गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलीस प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत. अशा भीषण अपघातांना भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणाच जबाबदार असल्याचं कबुली गृहमंत्री यांनी दिलीय.

Jan 3, 2014, 03:04 PM IST

<b>माळशेज घाट अपघातातील मृतकांची नावं</b>

ठाणे आगरातून अहमदनगरच्या दिशेनं निघालेल्या एसटीला गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास माळशेज घाटात भीषण अपघात झाला. एका नागमोडया वळणावर टेम्पोशी धडक टाळण्याच्या प्रयत्न करण्याच्या नादात बसवरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी टेम्पोने धडक दिल्याने बस १५० फूट दरीत कोसळली. या अपघातात २७ जण ठार झाल्याची भीती व्य़क्त होत आहे.

Jan 2, 2014, 07:20 PM IST

माळशेज अपघात: मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख, जखमींना ५० हजारांची मदत

माळशेज एसटी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आलीय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २ लाख रुपये तर परिवहन महामंडळानं ३ लाख रुपये मुख्यमंत्री निधीतून जाहीर केले आहेत.
तर जखमींचे उपचार सरकारी खर्चातून आणि ५० हजारांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आलीय.

Jan 2, 2014, 05:22 PM IST

माळशेज घाट अपघात : युद्धपातळीवर मदतकार्य सुरू

ठाणे आगरातून अहमदनगरच्या दिशेने निघालेल्या एसटीला गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास माळशेज घाटात भीषण अपघात झाला. एका नागमोडया वळणावर टेम्पोशी धडक टाळण्याच्या प्रयत्न करण्याच्या नादात बसवरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी टेम्पोने धडक दिल्याने बस १५० फूट दरीत कोसळली. दरम्यान, एस टी अपघातातील अनेकांना वाचविण्यासाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.

Jan 2, 2014, 01:29 PM IST

माळशेज घाटात एसटीला भीषण अपघात, २७ ठार

माळशेज घाटात एसटी बसला भीषण अपघात झाला. टेम्पोनं धडक दिल्यानं बस दरीत कोसळल्याने या अपघातात २७ जणांचा मृत्यू झाला. तर ६ जण जखमी झाले आहेत. एसटीमध्ये ४५ प्रवासी होते. यातील ४३ जणांची ओळख पटली आहे. दरम्यान, टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे.

Jan 2, 2014, 11:58 AM IST