मनसे पुन्हा मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक, परीक्षा केली रद्द

 राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पुन्हा एकदा मराठीच्या मुद्यावरुन आक्रमक झाले आहेत. इंग्रजीतून घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्यास भाग पाडले.

Updated: Aug 6, 2016, 11:59 PM IST
मनसे पुन्हा मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक, परीक्षा केली रद्द title=

मुंबई : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पुन्हा एकदा मराठीच्या मुद्यावरुन आक्रमक झाले आहेत. इंग्रजीतून घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्यास भाग पाडले.

मुंबईतल्या अग्निशमन दलातली खाते अंतर्गत परीक्षा वडाळा इथे घेण्यात आली. मात्र ही परीक्षा इंग्रजी भाषेतून होणार होती. याची माहिती मिळताच मनसे कार्यकर्त्यांनी परीक्षास्थळी धाव घेतली. आणि ही परीक्षा रद्द करायला परीक्षा आयोजकांना भाग पाडण्यात आले.

महानगरपालिका प्रशासनाचा सर्व कारभार मराठीमध्ये असताना, परीक्षा इंग्रजीमध्ये का असा सवाल, मनसेने यावेळी उपस्थित केला. पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा मनसेच्या हाती मिळाल्याने पालिका निवडणुकीत मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.