मेट्रो-३ आणि दादारकरांच्या बैठकीत तोडगा नाहीच

मेट्रो-३ स्टेशनसाठी दादरकरांना बजावण्यात आलेल्या नोटीस प्रकरणी मुंबईत महापौर बंगल्यावर आज एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रहिवाशांच्या पश्नावर कुठलाही तोडगा निघालेला नाही पण, गोंधळ मात्र नक्की झाला. 

Updated: Jun 13, 2015, 10:16 PM IST
मेट्रो-३ आणि दादारकरांच्या बैठकीत तोडगा नाहीच title=

मुंबई : मेट्रो-३ स्टेशनसाठी दादरकरांना बजावण्यात आलेल्या नोटीस प्रकरणी मुंबईत महापौर बंगल्यावर आज एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रहिवाशांच्या पश्नावर कुठलाही तोडगा निघालेला नाही पण, गोंधळ मात्र नक्की झाला. 

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेना, मनसेचे पदाधिकारी, दादरचे स्थानिक रहिवासी आणि एमएमआरडीए तसंच'एमएमआरसीएल'चे अधिकारी उपस्थित होते.

दादरचे स्थानिक रहिवासी, मनसे पदाधिकारी यांनी 'एमएमआरसीएल' अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. रहिवाशांना विस्थापित न करण्याचं लेखी आश्वासन द्या, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

या बैठकीत दादरकरांचं काही समाधान झालेलं नाही. प्रकल्पात स्पष्टता हवी असून मोकळ्या जागेत प्रकल्प करा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. 

दरम्यान, दादरकरांना विश्वासात घेऊन योग्य पुनर्वसन होणार असं आश्वासन शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी दिलंय. तर अखेरपर्यंत दादरकरांच्या पाठिशी उभं राहणार असल्याचं मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी म्हटलंय. 

दुसरीकडे प्रकल्पग्रस्तांचं त्याच जागी पुनर्वसन होणार असून चर्चेनंतर MOU बनवू असं प्रकल्प अधिकाऱ्यांनी बैठकीनंतर सांगितलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.