मुंबई : मुंबईतील सर्वसामान्य माणसांचं कामाच्या दूर असलेल्या ठिकाणांमुळे एकवेळचं जेवण सहसा बाहेरच होत असतं. मुंबईतील काही हॉटेल्समध्ये शुद्ध पाणी नसल्याचं सांगण्यात येत आहे.
यामुळे मुंबईकरांना पाण्यापासून कोणतेही आजार होऊ नयेत, यासाठी मुंबईतील प्रत्येक हॉटेल मालकाला आता, आरओ फिल्टर बसवूनच ग्राहकांना पाणी द्यावं लागणार आहे.
मुंबईतील सर्व हॉटेल्समध्ये फिल्टर केलेलं पाणी देण्यात यावं, यासाठी एक प्रस्ताव मुंबई महापालिकेत लवकरच मांडण्यात येणार आहे. यानंतर सर्व हॉटेल्समध्ये ग्राहकांना शुद्ध पाणी मिळणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.