मुंबई: अधिकारावरून भाजपा-शिवसेनेमध्ये निर्माण झालेला वाद आता पत्रकबाजीपर्यंत आला आहे. आपल्याला महसूल मंत्र्यांनी अधिकार दिले नसल्याची तक्रार शिवसेनेचे असलेले महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली होती.
त्यावर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी थेट पत्रक काढून राठोड यांच्या दाव्यातील हवा काढण्याचा प्रयत्न केलाय. राज्यमंत्री राठोड यांना नियमानुसार आपण कोणकोणते अधिकार दिले आहेत, हे खडसे यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढूनच जाहीर केलंय.
त्याशिवाय याबाबत त्यांनी ट्विटही केलं आहे. त्यामुळं राठोड खोटं बोलत असल्याचं एकप्रकारे खडसे यांनी दाखवून दिलंय. त्यामुळे अधिकार पदावरून भाजपा-शिवसेनेमध्ये सुरू असलेला हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.