www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवासात एक मृतदेह आढळला. आमदार निवासातील रुम नं ५१५ मध्ये हा मृतदेह आढळला
दासराव गणपतराव मोरे यांचा असल्याचं पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर सांगितलं. आकाशवाणी आमदार निवासातील रूम नंबर ५१५ मध्ये हा मृतदेह सापडला. ही रूम परभणी जिल्ह्यातील वसमतचे आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नावावर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मोरे आजारी होता. आज सकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला.
दासराव मोरे यांचा मृत्यू कशामुळे झाला, याची माहिती मिळू शकलेली नाही. दासराव मोरे हे आपल्या काही मित्रांबरोबर मुंबई पाहण्यासाठी आले होते. मात्र त्यांचे मित्र आमदार निवासात त्यांच्यासोबत नव्हते, अशी माहिती मिळत आहे. मोरे हे कोणाच्या ओळखीने आमदार निवासात राहत होते, याबाबत चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.