मुंबई : मनसे नगरसेवक संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या डोळ्यादेखत मनसेचे नगरसेवक फिरतात कसे असा सवाल दहियांनी पोलिसांना विचारला.
संध्याकाळपर्यंत दोघांनाही अटक करण्याचे तोंडी आदेशही यावेळी देण्यात आला आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरींवर पालिकेच्या अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईत पडलेल्या खड्ड्यांबाबत मनसेनं आंदोलन केलं. या आंदोलनावेळी मनसे नगरसेवकांनी अभियंत्यांच्या गळ्यात या खड्ड्यांना मीच जबाबदार आहे असे बॅनर लावले. मनसेच्या या आंदोलनामुळे अभियंत्यांनी आक्रमक पवित्रा घेत कामबंद आंदोलन केलं आहे.