मोदींचं भाषण झालं रद्द, सुरेश प्रभू झाले क्रुद्ध

`व्हॉर्टन इंडिया इकॉनॉमी` या परिषदेसाठी नरेंद्र मोदींना दिलेलं आमंत्रण रद्द केल्यानं शिवसेना नेते सुरेश प्रभू यांचा संताप झाला आहे. हा तर संपूर्ण देशाचा अपमान असल्याचं स्पष्टीकरण देत प्रभूंनी या परिषदेला जाण्याचा कार्यक्रम रद्द केलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 4, 2013, 10:40 PM IST

www.24taas.com, मुंबई
`व्हॉर्टन इंडिया इकॉनॉमी` या परिषदेसाठी नरेंद्र मोदींना दिलेलं आमंत्रण रद्द केल्यानं शिवसेना नेते सुरेश प्रभू यांचा संताप झाला आहे. हा तर संपूर्ण देशाचा अपमान असल्याचं स्पष्टीकरण देत प्रभूंनी या परिषदेला जाण्याचा कार्यक्रम रद्द केलाय.
या परिषदेसाठी व्याख्यानाचं सुरेश प्रभूंना आमंत्रण आहे. परिषदेच्या संयोजकांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनाही आमंत्रण दिलं होतं. मात्र नंतर ते रद्द केल्यानं सुरेश प्रभू यांचा संताप झालाय. आमंत्रण द्या, अशी मागणी करत मोदी तुमच्याकडे स्वत:हून आले नव्हते, मग त्यांना अशी अपमानास्पद वागणूक का ? असा सवाल प्रभू यांनी केलाय.

मोदी यांनी एका प्रगतीशील राज्याचं तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. अशा व्यक्तीला अशी वागणूक देणं योग्य नसल्याचं प्रभूंनी म्हटलंय.