मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने एसीबीच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना, मुंबई तसंच मुंबई बाहेरच्या ट्रॅफिक विभागातल्या भ्रष्टाचाराची चौकशीचे आदेश दिलेत.
हा चौकशी अहवाल सहा आठवड्यांत सादर करण्याबाबत उच्च न्यायालयानं सांगितलंय. मुंबई आणि मुंबई बाहेरच्या वाहतूक पोलीस विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार होतो.
या संबंधीचं स्टिंग ऑपरेशन पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील टोके यांनी केलं होतं. त्याआधारे प्रत्येक गुन्ह्यासाठी ट्रॅफिक पोलिसांचं रेटकार्ड ठरलेलं असल्याचा सनसनाटी दावा, कॉन्स्टेबल टोके यांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केला होता. या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान, न्यायालयानं हे निर्देश दिले.
भ्रष्टाचारात सामील व्हायला नकार दिल्यानं वरिष्ठांकडून छळ होत असल्याचंही, टोके यांनी याचिकेत म्हटलंय.