www.24taas.com,मुंबई
मुंबईतल्या कफ परेड भागातल्या जॉली मेकर्स चेम्बरमध्ये १९ व्या मजल्यावर आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झालय. ही आग विझवण्यासाठी जवळजवळ तीन ते साडेतीन तास लागले.
जॉली चेम्बर्स ही रहिवासी इमारत असल्यानं याठिकाणच्या रहिवाशांना सुरक्षितसस्थळी हलवणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी अग्निशमन दलावर होती. या इमारतीतले सर्व रहिवासी सुरक्षित आहेत मात्र आगीमुळे फ्लॅटमधील वस्तू जळून खाक झाल्या आहेत. एसीची वायर शॉर्ट झाल्यानं ही आगल्याचं सांगण्यात येतय.
दक्षिण मुंबईतल्या कफ परेड परिसरातील जॉली मेकर चेंबर्स - १ इमारतीच्या १९व्या मजल्याला आग लागताच अग्नीशमन दलाच्या आठ बंबगाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. या आगीत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र अग्नीशमन दलाने अधिकृतरित्या आगीचे कारण सांगितलेले नाही. दरम्यान, इमारतीतील सर्व रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. इमारतीमधील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता.
मंत्रालयाच्या आगीनंतर गृहखात्याचा कारभार फक परेडमधील हंगामी कार्यालयातून चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. गृहखात्याचे हे कार्यालय तसेच मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर जॉली मेकर चेंबर्स-१ इमारतीच्या जवळच आहे. सुदैवाने जॉली मेकर चेंबर्स- १ इमारतीच्या आगीमुळे या महत्त्वाच्या ठिकाणांची हानी झालेली नाही.