मुंबई : सध्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड करुन उभी असलेली शिवसेना भाजप, मुंबई महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत मात्र हातात हात घालून एकमेकांना साथ देणार असल्याची शक्यता बळावली आहे.
शिवसेनेच्या सभागृह नेत्यांनी काँग्रेस मुक्त महापालिकेची हाक दिली आहे. त्यामुळे प्रभाग समिती अध्यक्षपद निवडणुकीत, शिवसेना भाजपला अप्रत्यक्षपणे मदत करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
असं झालं तर शिवसेनेला ७ तर भाजपला ८ प्रवाग समित्या मिळण्याची चिन्हं आहेत. आज प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे अर्ज भरले जात आहेत.