मुंबई पुन्हा हादरली, महिलेवर धावत्या कारमध्ये गँगरेप

दिल्र्लीतील निर्भया गँगरेप प्रकरण आणि मुंबईतील शक्तीमिल कंपाऊंड गँगरेप प्रकरण ताजं असतांनाच पुन्हा एकदा देशाची आर्थिक राजधानी हादरलीय. मुंबईत पुन्हा सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका ४० वर्षीयवर महिलेवर कारमध्ये बलात्कार करण्यात आलाय. 

Updated: Jul 24, 2014, 01:50 PM IST
मुंबई पुन्हा हादरली, महिलेवर धावत्या कारमध्ये गँगरेप title=

मुंबई: दिल्र्लीतील निर्भया गँगरेप प्रकरण आणि मुंबईतील शक्तीमिल कंपाऊंड गँगरेप प्रकरण ताजं असतांनाच पुन्हा एकदा देशाची आर्थिक राजधानी हादरलीय. मुंबईत पुन्हा सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका ४० वर्षीयवर महिलेवर कारमध्ये बलात्कार करण्यात आलाय. 

ओळखीच्या असलेल्या दोन जणांनी बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. याप्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शॉपिंग करण्यासाठी ही माहिला मंगळवारी वांद्र्याला आली होती. त्यानंतर तिनं वांद्रे रेल्वे स्थानका बाहेरून रिक्षा केली. 

पण रिक्षावाल्यानं तिला तिनं सांगितलेल्या ठिकाणी न सोडता धारावीला सोडलं. तिथं ही पीडित महिला टॅक्सीची वाट पाहत उभी होती. त्यावेळी तिच्या ओळखीचे असलेले दोघं आरोपी गाडीनं आले आणि घरी सोडण्याच्या बहाण्यानं तिला गाडीत बसवलं. यानंतर दोघांनी तिच्यावर धावत्या कारमध्येच बलात्कार केला आणि २५ मिनिटांनी पुन्हा धारावीजवळ सोडलं, अशी माहिती पीडित महिलेनं पोलिसांना दिलीय. त्यानंतर धारावी पोलिसांनी तिची तक्रार दाखल केलीय.

महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघा आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय, पण त्यांना अटक केलेली नाही. आपण कोणताही गुन्हा केला नसल्याचं सांगत आरोपींनी महिलेचे सर्व आरोप फेटाळून लावलेत. त्यामुळं पेच निर्माण झाल्यानं पोलिसांनी तपास सुरू केलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.