'खुर्ची टिकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची बाळासाहेबांच्या स्मारकाला परवानगी'

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या वादात आता काँग्रेस नेते नारायण राणेंनीही उडी घेतलीय. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद टीकवण्यासाठी महापौर बंगल्यात बाळासाहेबांच्या स्मारकाचा निर्णय़ घेतल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केलाय. 

Updated: Nov 19, 2015, 06:38 PM IST
'खुर्ची टिकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची बाळासाहेबांच्या स्मारकाला परवानगी' title=

मुंबई : बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या वादात आता काँग्रेस नेते नारायण राणेंनीही उडी घेतलीय. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद टीकवण्यासाठी महापौर बंगल्यात बाळासाहेबांच्या स्मारकाचा निर्णय़ घेतल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केलाय. सोबतच, माननीय बाळासाहेबांचं स्मारक दादरमध्येच व्हावं ही आपली प्रामाणिक इच्छा असल्याचंही नमूद करायला ते विसरले नाहीत.

अधिक वाचा - शिवसेनाप्रमुखांचं भव्य स्मारक महापौर बंगल्यात - मुख्यमंत्र्यांची घोषणा

उद्धव ठाकरेंना महापौर बंगला बळकायचा आहे म्हणून त्यांनी याठिकाणी स्मारकाचा निर्णय घेतल्याचा आरोप केलाय. महापौर बंगल्यात स्मारक उभारणं नियमबाह्य असल्याचा दावाही राणेंनी केलाय. 

अधिक वाचा - बाळासाहेबांचं स्मारक महापौर बंगल्यात नको - राज

मंगळवारी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक महापौर बंगल्यात होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावेळी उद्धव ठाकरेही उपस्थित होते. युती सरकारच्या कार्यकाळातच हे स्मारक पूर्ण होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.