नारायण राणेंना आली बाळासाहेबांची आठवण पण...

काँग्रेस नेते नारायण राणे यांनी विधानपरिषदमध्ये महापालिकेतील शिवसेनेच्या कारभारावर जोरदार टीका केली. 

Updated: Aug 5, 2016, 11:42 AM IST
नारायण राणेंना आली बाळासाहेबांची आठवण पण... title=

मुंबई : काँग्रेस नेते नारायण राणे यांनी विधानपरिषदमध्ये महापालिकेतील शिवसेनेच्या कारभारावर जोरदार टीका केली. 

शिवसेनेची गेल्या २५ वर्षांपासून पालिकेत सत्ता आहे. मात्र पालिकेचा कारभार मात्र भोंगळपणे सुरु आहे. महापालिकेत टेंडर आल्यावर पाच टक्के हे पक्षाला जातात, यापैकी पीएला 2 टक्के जातात. मिठी नदीच्या गाळातून आता पैसे येतात, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर तोफ डागली.

यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींचा उल्लेख केला. पालिकेतील शिवसेनेच्या सत्तेला २५ वर्ष झाली. या काळात झाड वाढायला हवे होते. फळं, सावली मिळायला हवी होती. मात्र तसेच काही झाले नाही. साहेब गेल्यावर दुर्दशा झाली, असे राणे यावेळी म्हणाले.

महापालिकेत भ्रष्टाराचा गाळ अधिक आहे. हा भ्रष्टाचार मुळापासून उखडून काढायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. मुंबई पालिकेचा कारभार ठप्प आहे. हा कारभार वेगाने होण्यासाठी एक अजय मेहता नाही तर 12 मेहता लागतील, असे राणेंनी यावेळी सांगितले.