भाजप आणि राष्ट्रवादीचं साटंलोटं, अशोक चव्हाणांचा आरोप

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या नेत्यांच्यापाठी राज्यातील मोठे नेते उभे असून काँग्रेसच्या अस्तित्वासाठी ही  निवडणूक महत्वाची असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. ते नवी मुंबईत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादीचं साटंलोटं असल्याचा आरोप केलाय. 

Updated: Apr 18, 2015, 10:26 PM IST
भाजप आणि राष्ट्रवादीचं साटंलोटं, अशोक चव्हाणांचा आरोप title=

नवी मुंबई: महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या नेत्यांच्यापाठी राज्यातील मोठे नेते उभे असून काँग्रेसच्या अस्तित्वासाठी ही  निवडणूक महत्वाची असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. ते नवी मुंबईत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादीचं साटंलोटं असल्याचा आरोप केलाय. 

ही निवडणूक काँग्रेस सर्व शक्ती लावून लढवणार असून, यासाठी काँग्रेस शर्थीचे प्रयत्न करणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कार्यकर्ता मेळाव्यात म्हटलंय. यावेळी काँग्रसेचा वचननामा जाहीर करण्यात आलाय. 

यावेळी बोलतांना चव्हाण म्हणाले, राज्याचं नगरविकास खातं काँग्रेसकडे होतं त्यामुळे नवी मुंबईतला विकास काँग्रेसनं केलाय. नवी मुंबईतल्या नागरिकांच्या विकासाठी काँग्रेस कटिबद्ध असून, संपूर्ण वर्षभर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरा करणारा काँग्रेस पहिला पक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं.

इंदू मिलमध्ये जयंतीच्या दिवशी भूमीपूजन व्हावं ही काँग्रेसची इच्छा होती. इंदू मिलमधल्या स्मारकाचा निर्णय काँग्रेसचा आहे. काँग्रेसने गरिबांसाठी योजना आणल्या.. भाजपनं गरिबांच्या योजना बंद केल्या.
'अच्छे दिन आ गये और गरीबोंका अनाज खा गये' अशी टीका चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.

भूमि अधिग्रहण कायद्यामुळे शेतकरी भूमिहीन होणार असून, भाजपनं बहुमताच्या जोरावर हा कायदा मंजूर केलाय. कामगारांचे कायदे भाजपनं गुंडाळले. राज्यातल्या विद्यमान सरकारच्या विरोधातलं मतदान केलं पाहिजे, असं आवाहन अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

नवी मुंबईचा विकास काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी केला. शहराचा विकास व्हायला हवाय
जे शहरातल्या नागरिकांना पाणी देऊ शकणार नाहीत त्यांना या निवडणुकीत पाणी पाजा, असं अशोक चव्हाण यांनी आवाहन केलं. त्याचबरोबर राष्ट्रवादी विरोधात की सत्तेत हेच माहीत नाही
राष्ट्रवादीचं भाजपशी साटंलोटं असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधात बसायचंय की भाजपला पाठिंबा देत सत्तेत जायचंय, असं म्हणत चव्हाणांनी शिवसेनेलाही टोला लगावलाय. काँग्रेसनं विरोधी पक्ष स्वीकारलाय भाजपनं काळा पैसा परत आणण्याच्या नावावर नागरिकांना फसवलंय. शिवसेनेनं भाजपला ओळखलं पाहिजे, नाही तर राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर ते सत्तेत जातील. राज्यात शिवसेना-भाजप युतीमध्ये काय चाललंय हे जनतेला माहीत असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.