मुंबईत कारमध्ये सापडल्या १ कोटी ४० लाखांच्या नव्या नोटा

 देशाच्या कानाकोपऱ्यासह आता मुंबईतही नव्या नोटा पकडण्याचे प्रकार  घडत आहेत. मुंबईतील जुहू वर्सोवा लिंक रोडवर एका संशयीत गाडीत १ कोटी ४० लाख रुपयांच्या नव्या नोटा सापडल्या. 

Updated: Dec 16, 2016, 11:00 PM IST
मुंबईत कारमध्ये सापडल्या १ कोटी ४० लाखांच्या नव्या नोटा  title=

मुंबई :  देशाच्या कानाकोपऱ्यासह आता मुंबईतही नव्या नोटा पकडण्याचे प्रकार  घडत आहेत. मुंबईतील जुहू वर्सोवा लिंक रोडवर एका संशयीत गाडीत १ कोटी ४० लाख रुपयांच्या नव्या नोटा सापडल्या. 

आज सायंकाळी सातच्या सुमारास  अंधेरी पश्चिमेला जुहू येथील धारा कॉम्प्लेक्स येथे, जुहू वर्सोवा लिंक रोड जवळ, नाका नंदी पॉइंट येथे एक टोयोटा कार संशयास्पद रित्या जात असताना पोलिसांनी तपासले,  या गाडीचा क्रमांक MH 48 AC 5152 आहे. 

या गाडीतून ४ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १ कोटी ४० लाख रुपयांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या. 

दरम्यान, रोख रक्कम पंचनाम्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतली असून आयटी विभागाला कळविण्यात आले आहे.