मुंबईच्या 5 एंट्री पॉइंटवर ठाणे, नवी मुंबईकरांना टोलमुक्ती मिळण्याची शक्यता

मुंबईच्या 5 एंट्री पॉइंटवर ठाणे आणि नवी मुंबईकरांना टोलमुक्ती मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भातला प्रस्ताव सरकारनं तयार केल्याची माहिती मिळतेय. 

Updated: Jun 16, 2015, 03:27 PM IST
मुंबईच्या 5 एंट्री पॉइंटवर ठाणे, नवी मुंबईकरांना टोलमुक्ती मिळण्याची शक्यता title=

मुंबई: मुंबईच्या 5 एंट्री पॉइंटवर ठाणे आणि नवी मुंबईकरांना टोलमुक्ती मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भातला प्रस्ताव सरकारनं तयार केल्याची माहिती मिळतेय. 

MH-04, MH-43 आणि MH-46 या नंबरचं पासिंग असलेल्या कारला मुंबईच्या पाच एंट्री पॉइंटवर टोलमुक्ती देण्याचा सरकारचा विचार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास 1 ऑगस्टपासून ही टोलमुक्ती लागू होण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी म्हटलंय. 

मात्र MH-01, MH-02 आणि MH-03 या मुंबईतल्या आरटीओचं पासिंग असलेल्या वाहनांना ऐरोली, वाशी, ठाणे, मुलुंड आणि दहिसर इथल्या पाच एंट्री पॉइंटवर टोलमुक्तीबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचं समजतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.