आघाडी होणार नाही, नारायण राणेंचे संकेत

राष्ट्रवादीसोबत आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी झी 24 तासवरील रोखठोक कार्यक्रमात बोलताना दिले. 

Updated: Sep 24, 2014, 07:35 PM IST
आघाडी होणार नाही, नारायण राणेंचे संकेत  title=

मुंबई : राष्ट्रवादीसोबत आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी झी 24 तासवरील रोखठोक कार्यक्रमात बोलताना दिले. 

अशक्य असलेल्या अटी राष्ट्रवादी घालत असल्यानं, त्यांची आघाडी करण्याची इच्छा दिसत नाहीय, असं ते म्हणाले. आम्ही १२८ जागा देण्याची तयारी दिली आहे. आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहेत. पण ते १४४ जागांवर अडून बसले आहेत. त्यामुळे त्यांना आघाडी करण्याची इच्छा दिसत नाही, असेही राणे यांनी सांगितले. 

दरम्यान, दीपक केसरकर आणि भास्कर जाधव या आपल्या विरोधकांना निवडणुकीत धडा शिकवणार असल्याचं सूतोवाचही राणेंनी यावेळी केलं...

महायुतीपाठोपाठ आघाडीही फुटीच्या उंबरठ्यावर आहे. राष्ट्रवादीनं काँग्रेसचा १२८ जागांचा फॉर्म्युला धुडकावून लावलाय. राष्ट्रवादीनं स्बवळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादीनं निम्म्या जागांसह अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचीही मागणी केलीय. त्यामुळं तडजोड होणं कठीण दिसतंय. 

राष्ट्रवादीच्या स्वबळाच्या भूमिकेनंतर काँग्रेसनं चर्चेची तयारी दर्शवलीय़.. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संपर्क साधलाय...जागावाटपाबाबत चर्चा करण्याची मागणी काँग्रेसनं राष्ट्रवादीकडे केलीय..तर दुसरीकडे महायुती आणि आघाडीत जागावाटपाचा तिढा सुटलेला नसताना उमेदवारी निश्चित असलेले अनेक जण उद्या अर्ज दाखल करणार आहेत. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.