मुंबई : मुख्यमंत्री किंवा कोणत्याही खात्याचा मंत्री अगर वरिष्ठ अधिकारी जिल्ह्याच्या दौर्यावर आला की त्यांना दिली जाणारी मानवंदना यापुढे बंद करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीचा हा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री, कोणत्याही खात्याचा मंत्री, शासनाचे वरिष्ठ अधिकारी एखाद्या जिल्ह्याच्या दौर्यावर जातात त्यावेळी स्थानिक पोलिसांच्यावतीने बॅण्ड पथक तसेच इतर लवाजमा आणून मानवंदना देण्याची पद्धत आहे. ही मानवंदना देताना काही कसूर राहू नये यासाठी पोलीस आधीपासूनच त्याच्या तयारीला लागतात. यामुळे पोलिसांचा वेळ वाया जातो. याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही पद्धत बंद करण्याचे निर्देश दिले.
मानवंदनेपेक्षा नागरिकांची सुरक्षितता आणि गुन्हे रोखणे महत्त्वाचे आहे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी ही पद्धत बंद करण्याचे निर्देश दिलेत. त्यानुसार यापुढे कोणत्याही मंत्र्याला मानवंदना देण्यात येणार नाही, असे राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक देवेन भारती यांनीही स्पष्ट केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.