मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट टळलं

पाणीकपातीला सामोरं जाणाऱ्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडकसागर तलावही तुळशी तलावानंतर भरून वाहतोय.

Updated: Jul 30, 2014, 07:35 PM IST
मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट टळलं title=

मुंबई : पाणीकपातीला सामोरं जाणाऱ्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडकसागर तलावही तुळशी तलावानंतर भरून वाहतोय.

मोडकसागर तलाव बुधवारी पहाटे 4 वाजता भरून वाहू लागला. यामुळे मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट टळलंय. या तलावाची क्षमता १ लाख २९ हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची आहे. 

२४ तासांत तब्बल २१६ मिमी पाऊस पडल्याने मोडकसागर तलावातील पाणीसाठय़ात मंगळवारी १७ हजार ७५३ दशलक्ष लिटर पाणीसाठय़ाची वाढ झाली होती.  तलावाची उंची १६३.१५ मीटर आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.