अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. विरोधकांनी बहिष्कार घालत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष पॅकेजची मागणीही केली. 

Updated: Mar 8, 2015, 08:42 PM IST
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार title=

मुंबई: अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. विरोधकांनी बहिष्कार घालत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष पॅकेजची मागणीही केली. 

शेतकरी प्रश्नाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. शेतीसाठी स्वतंत्र मंत्री असावा अशी मागणीही विरोधी पक्ष गटनेत्यांच्या बैठकीत करण्यात आली. 

तसंच मुस्लिम आणि धनगर आरक्षणाबाबतही सरकारनं फसवणूक केल्याचे आरोप केले आहेत. अॅपिडेमिकमुळे कधी नव्हे इतके रूग्ण दगावल्यानं नैतिक जबाबदारी म्हणून आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही त्यांनी यावेळी मागणी केली. 

अधिवेशनात विविध मुद्यांवरुन सरकारला घेरण्याची रणनिती विरोधकांनी आखली आहे. सोबतच दुष्काळ आणि अवकाळी पावसानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या, मुस्लीम-धनगर आरक्षण, गोवंश हत्याबंदी, मुंबईचा विकास आराकडा या आणि इतर महत्त्वाच्या मुद्यांवरही सरकारची कसोटी लागणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.