नव्या विकास आराखड्यावर राज ठाकरेंचं व्यंगचित्रातून भाष्य

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या नव्या विकास आराखड्यावर आपल्या व्यंगचित्राने भाष्य केलंय. नवा विकास आराखडा मराठी माणसासाठी मारक असल्याचं राज ठाकरेंनी रेखाटलंय.

Updated: Mar 8, 2015, 07:39 PM IST
नव्या विकास आराखड्यावर राज ठाकरेंचं व्यंगचित्रातून भाष्य title=

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या नव्या विकास आराखड्यावर आपल्या व्यंगचित्राने भाष्य केलंय. नवा विकास आराखडा मराठी माणसासाठी मारक असल्याचं राज ठाकरेंनी रेखाटलंय.

या व्यंगचित्रात मराठी माणूस तीन भव्य इमारतींमध्ये लटकलेला दिसतोय आणि खाली मुंबईचा विकास आराखडा? असं त्यात लिहिलंय. 

नव्या विकास आराखड्यावरून बीएमसीमध्ये सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये आधीच जुंपली आहे. त्यातच उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन आहे. त्यामुळं वर्धापनदिनी या नव्या विकास आराखड्याचा राज ठाकरे कसा समाचार घेतात, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.