मुंबई : नाईट लाईफ प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलंय. त्यावर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करु नये, अन्यथा न्यायालयानंच राज्यकारभार चालवावा, अशी रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
न्यायालयाचा आपण आदर करतो. मात्र राज्यात आणि देशात लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत न्यायालयानं हस्तक्षेप करणं हा लोकशाहीचा अपमान आहे, असे राऊत म्हणालेत.
नाईट लाईफ संबंधी काय निर्णय घ्यायचा तो लोकनियुक्त सरकार घेईल. प्रत्येक गोष्टीत न्यायालयानं हस्तक्षेप करु नये. अन्यथा न्यायालयानंच राज्यकारभार चालवावा असं मत, संजय राऊत यांनी मांडलंय.
दरम्यान, नाईट लाईफ दरम्यान सुरक्षेचा आढावा घेतलाय का? नाईट लाईफ दरम्यान महिलांच्या सुरक्षेची हमी काय ? अशी विचारणा करत, येत्या १० एप्रिलपर्यंत याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. यावर राऊत यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.