मुंबई : महिला आणि बालविकास खात्यातील २०६ कोटींचा साहित्य खरेदीचा कथित घोटाळा उघड करण्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा हात असल्याची चर्चा आहे.
प्रधान सचिवांकडून चौकशी
यासंबंधी पहिली तक्रार धनंजय मुंडे यांनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. याबाबतची प्रधान सचिवांकडून चौकशीदेखील करण्यात आली होती. त्याचबरोबर याबाबतची कागदपत्रंही त्यांनीच उघडकीला आणल्याचं समजतंय. त्यामुळं बीड-परळी वाद आता मुंबईच्या रिंगणात आल्याचं स्पष्ट होतंय
काँग्रेसची तक्रार
दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या महिला आणि बालकल्याण विभागातल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी ACBनं खात्याच्या प्रधान सचिवांकडे विचारणा केली आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी काल याबाबत तक्रार केली होती. त्यावर ACBनं सचिवांकडे अभिप्राय मागवला आहे. तर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा पंकजा मुंडेंची पाठराखण केलीय..
पावसाळी अधिवेशनात मुद्दा तापणार
पावसाळी अधिवेशनात पंकजा मुंडेवरील आरोपांचा मुद्दा चांगलाच तापणार आहे. विरोधक हा मुद्दा लावून धरणार आहेत. एकाच दिवसात पंचवीस निर्णय पारीत केले गेले. हे निर्णय घेताना घाई का केली गेली. हे सगळं संशयास्पद वाटतंय या सर्वप्रकरणांची एस.आय.टी. किंवा सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहीजे. त्यामुळेच फडणवीस सरकारच्या विश्वासाहर्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, असं मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलंय.
गिरीष बापट यांची चुपी
पंकजा मुंडेंवर झालेल्या आरोपावर प्रतिक्रिया देण्यास भाजपा नेते टाळाटाळ करतायत. रत्नागिरी दौऱ्यावर आलेले अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनीही भाजपावर झालेल्या आरोपांवर बोलणं टाळलंय. तुमचं काय चालू द्या माझं काहीही म्हणणं नाही असं म्हणत त्यांनी पंकजा मुंडे विषयावर बोलणं टाळलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.