मुंबई : माझ्या भावना या रामटेक बंगल्याशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे हा बंगला मला द्यावा, अशी मागणी करणाऱ्या मंत्री पंकजा पालवे-मुंडे यांच्या पदरी निराशा आली आहे. राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना रामटेक हे शासकीय निवासस्थान देण्यात आलंय.
भाजपच्या मंत्र्यांमध्ये रामटेक मिळवण्यासाठी लागलेली स्पर्धा संपुष्टात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाखालोखाल रामटेक आलिशान, मोठा असलेला दुसरा बंगला आहे. उपमुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेला हा बंगला मंत्रीमंडळातलं ज्येष्ठतेचं प्रतिकही मानला जातो.
यामुळेच नव्या सरकारमधले अनेक मंत्री रामटेक मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी या बंगल्यावर जाहीर दावाही सांगितला होता. मात्र, खडसे यांना हा बंगला देण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.