पत्नीसह विनोद कांबळी विरोधात मोलकरणीचा मारहाणीचा आरोप, गुन्हा दाखल

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आणि त्याची पत्नी अँड्रियाविरुद्ध त्यांच्याच मोलकरीण सोनी नफायासिंह सरसाल (३०) नं मारहाणीची तक्रार केलीय.

Updated: Aug 30, 2015, 03:50 PM IST
पत्नीसह विनोद कांबळी विरोधात मोलकरणीचा मारहाणीचा आरोप, गुन्हा दाखल  title=

मुंबई: टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आणि त्याची पत्नी अँड्रियाविरुद्ध त्यांच्याच मोलकरीण सोनी नफायासिंह सरसाल (३०) नं मारहाणीची तक्रार केलीय.

आणखी वाचा - धोनीने कसोटीतून अचानक निवृत्ती का घेतली, रवी शास्त्रीने केला खुलासा!

कांबळी आणि अँड्रियाविरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपासून सोनी विनोद कांबळीकडे काम करतेय. तिनं आरोप लावलाय, विनोद कांबळी आणि अँड्रियाकडे आपला पगार मागितला तेव्हा त्या दोघांनी तिला जबर मारहाण केली. एवढंच नव्हे तर मारहाणीनंतर तिला तीन दिवस एका खोलीत बंद करून ठेवण्यात आलं, नंतर सोडून तिला घरातून हाकलवून दिलं.

कांबळीच्या घरातच राहायची सोनी

सोनी घरातून निघाल्यानंतर सरळ वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तिनं पोलिसांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला. पोलिसांनी विनोद कांबळी आणि त्याच्या पत्नीविरोधात आयपीसी कलम ३४२, ५०४, ५०६ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस पुढील तपास करीत आहेत. हाउसमेड म्हणून सोनी कांबळीच्या घरातच राहत होती. 

आणखी वाचा - महिला क्रिकेटपटूच्या बॉलवर बोल्ड झाला अकमल, सगळीकडे थट्टा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.