सोशल मीडिया माध्यमातून प्रचार, निवडणूक आयोगाची नजर

राज्यातील पालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार 19 फेब्रुवारीला संपणार आहे. तसेच आज मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रचार तोफा थंडावणार आहेत.  आचारसंहितेनुसार मतदानापूर्वी दोन दिवस प्रचार करता येत नाही. मात्र सोशल मीडियासारख्या माध्यमातून करण्यात येणा-या प्रचाराला आळा कसा घालणार हा प्रमुख प्रश्न आहे. यासाठी निवडणूक आयोगाने कठोर पावले उचलली आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 18, 2017, 11:07 AM IST
सोशल मीडिया माध्यमातून प्रचार, निवडणूक आयोगाची नजर title=

मुंबई : राज्यातील पालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार 19 फेब्रुवारीला संपणार आहे. तसेच आज मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रचार तोफा थंडावणार आहेत.  आचारसंहितेनुसार मतदानापूर्वी दोन दिवस प्रचार करता येत नाही. मात्र सोशल मीडियासारख्या माध्यमातून करण्यात येणा-या प्रचाराला आळा कसा घालणार हा प्रमुख प्रश्न आहे. यासाठी निवडणूक आयोगाने कठोर पावले उचलली आहेत.

आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या काळात सोशल साईट्सवरुन निवडणूक प्रचार करणं ही काळाची गरज ठरलीय. यामुळे आजकाल सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवार सोशल साईट्सद्वारे प्रचार करतात. मात्र मतदानाच्या आधी दोन दिवस आचारसंहितेनुसार प्रचार थांबवावा लागतो. 21 फेब्रुवारीला मुंबई महापालिकेसाठी मतदान होणार आहे. याआधी दोन दिवस आधी म्हणजे 19 फेब्रुवारीला प्रचाराच्या तोफा थंडावतील. मात्र सोशल साईट्सद्वारे करण्यात येणाऱ्या प्रचाराचं काय ? 

राजकीय पक्ष, उमेदवार आपल्या अधिकृत प्रोफाईलवर प्रचाराचा मजकूर अपलोड करु शकतील का ? कोणा कार्यकर्त्यानं किंवा अगदी सामान्या नागरीकाने उमेदवाराबाबत काही माहिती टॅग केली तर ? असे अनेक प्रश्न आहेत. यावर राज्य निवडणूक आयोगान आचारसंहितेचा भंग झालेला मजकूर आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, या काळात राजकीय पक्ष कुशलतेने या माध्यमाचा वापर करणार हे नक्की. माहिती तंत्रज्ञानाच्या वेगान होणाऱ्या प्रगतीमुळे इथून पुढच्या निवडणुका या हायटेक नक्कीच असतील याचबरोबर निवडणूक आयोगासाठी त्या अधिक आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.