प्रदेशाध्यक्षपदासाठी आर.आर.आबांचे नाव?

तसेच विद्यमान प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या जागी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 7, 2013, 08:49 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले असून येत्या ४ दिवसात मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहे. तसेच विद्यमान प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या जागी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
येत्या १५ जून रोजी नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड करण्यात येणार असल्याचे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. मधुकर पिचड यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडले तर त्यांची वर्णी मंत्रिमंडळात लागू शकते अशीही शक्यता राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले.

कोणत्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले
कॅबीनेटमंत्री (राष्ट्रवादी) : छगन भुजबळ, आर. आर. पाटील, अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे, मनोहर नाईक, गणेश नाईक, हसन मुश्रीफ, विजयकुमार गावित, जयदत्त क्षीरसागर, राजेश टोपे, लक्ष्मण ढोबळे, रामराजे निंबाळकर,बबनराव पाचपुते, अनिल देशमुख(एकुण-१५)
राज्यमंत्री (राष्ट्रवादी) : भास्कर जाधव, सचिन अहिर, फौजिया खान, प्रकाश सोळंके, गुलाबराव देवकर(एकुण-५)
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.