मुंबई : वादग्रस्त कारणांनी चर्चेत राहणारा सेलिब्रेटी राहुल महाजन याने पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेले एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतेय.
मोदींच्या डिग्रीबाबत सध्या वाद सुरु आहे. याप्रकरणी महाजन याने मोदींच्या समर्थनार्थ ट्वीट केलेय.
जे १२ वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिले. दोन वर्षांपासून पंतप्रधान आहेत. त्यांच्याविरुद्ध ना बेसुमार संपत्ती जमवल्याचा आरोप आहे ना कोणत्या घोटाळ्यात सहभागाचा. आरोप आहे ते डिग्री आणि सूटावरुन, असं राहुलने ट्विटमध्ये म्हटलंय.
व्हायरल होत असलेल्या या ट्विटवर भाजप सरकारमधील गिरीराज सिंह या मंत्र्यांसह अनेक भाजप नेते रिट्विट करतायत.
एक नेता 13 साल CM रहा, 2 साल से PM है. लेकिन उसके खिलाफ ना बेशुमार संपत्ति बनाने के आरोप ना गबन और घोटाले के. आरोप हैं तो डिग्री और सूट के.
— Rahul Mahajan (@TheRahulMahajan) May 15, 2016