गणेशाला निरोप दिल्यावर वरुनराजा पुन्हा बरसणार

गणेशाच्या आगमनाआधीच महाराष्ट्रातून गायब झालेला पाऊस आता गणेशाला निरोप दिल्यावर म्हणजे शुक्रवारपासून पुन्हा बरसेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय. त्यासाठी मराठवाड्याच्या पूर्वेला कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, त्याचा प्रवास पूर्व मराठवाड्यापासून पश्चिम किनारपट्टीकडे होईल असं अंदाजात म्हटलंय.

Updated: Sep 12, 2016, 02:58 PM IST
गणेशाला निरोप दिल्यावर वरुनराजा पुन्हा बरसणार

मुंबई : गणेशाच्या आगमनाआधीच महाराष्ट्रातून गायब झालेला पाऊस आता गणेशाला निरोप दिल्यावर म्हणजे शुक्रवारपासून पुन्हा बरसेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय. त्यासाठी मराठवाड्याच्या पूर्वेला कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, त्याचा प्रवास पूर्व मराठवाड्यापासून पश्चिम किनारपट्टीकडे होईल असं अंदाजात म्हटलंय.

शुक्रवारनंतर मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि कोकणात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. शुक्रवारी आलेला पाऊस शनिवार आणि रविवारीही पाऊस कायम राहिल असंही म्हटलंय.