राज यांची मुख्यमंत्र्यांशी तासभर चर्चा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सकाळी सह्याद्री अतिथिगृहावर जाऊन भेट घेतली. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी तासभर बातचीत केली. 

Updated: Jan 13, 2015, 11:00 AM IST
राज यांची मुख्यमंत्र्यांशी तासभर चर्चा title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सकाळी सह्याद्री अतिथिगृहावर जाऊन भेट घेतली. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी तासभर बातचीत केली. 

विद्यार्थ्यांच्या दफ्तराचे ओझे कमी करण्याचा सोधासोपा उपाय यासंबंधी आज सकाळी ८.०० वाजता वर्षा निवासस्थानी मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

परीक्षांनुसार पुस्तकांची विभागणी करण्याबाबतचा प्रस्ताव मनसेनं दिलाय. तसं एक पुस्तकही राज ठाकरेंनी या भेटीत फडणवीसांना सादर केलं. 

पुढील आठवड्यात कॅबिनेटमध्ये यावर प्रेझेंटेशन होणार असून यावर तातडीनं निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय... विशेष म्हणजे, झी 24 तासनं काल रात्री 8 वाजताच्या मुंबई-पुणे-नाशिक-नागपूर या बातमीपत्रात सर्वप्रथम दप्तराच्या ओझ्याला वाचा फोडली

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.