राज ठाकरेंनी घेतला नरेंद्र मोदींचा समाचार

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा लक्ष्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्य़क्ष राज ठाकरे यांनी केलंय. मुंबई हे गुजराथींचे माहेर आहे, असं मोदी म्हणातात. मग मराठी माणसांचे सासर आहे, का असा सवाल राज यांनी केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 3, 2014, 09:20 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा लक्ष्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्य़क्ष राज ठाकरे यांनी केलंय. मुंबई हे गुजराथींचे माहेर आहे, असं मोदी म्हणातात. मग मराठी माणसांचे सासर आहे, का असा सवाल राज यांनी केलाय.
मुंबईत येऊन बाळासाहेबांचं नाव घ्यायला कसं विसरता, असा सवाल राज यांनी मोदी यांना केला. मनसेने आयोजित केलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्यात राज बोलत होते. याशिवाय संयुक्त महाराष्ट्राच्या जखमांच्या खपल्या पुन्हा काढू नका, असा इशारा राज यांनी दिला.
तर दुसरीकडे जैन समाजाला अल्पसंख्याचा दर्जा देणे हे राजकारण असल्याची टीका राज यांनी केलीय. मराठी विभागात जैन समाजाचे टॉवर कसे उभे राहातात, असा सवाल त्यांनी यावेळी विचारला आहे. मराठी लोकांना या विभागात अल्पसंख्याचा दर्जा देणे योग्य होईल, असे राज म्हणालेत.
टोलचा मुद्दा माझाच आहे, असं सांगत राज ठाकरे यांनी शिवसेनेचं नाव न घेता टोला लगावलाय. मुंबईतल्या परळमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मनसेच्या आंदोलनामुळे ५६ टोल नाके बंद पडले, आता ९ तारखेपासून राज्यात कसा धमाका करतो ते पाहाच, असा इशारा राज यांनी या सभेत दिलाय.
दरम्यान, याआधी येत्या ९ तारखेला पत्रकारांना नक्कीच खाऊ देईल, असं सूचक वक्तव्य राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय. पुण्यात एका पुस्तकाचं प्रकाशन राज यांनी केलं, त्यावेळी ते बोलत होते. मनसेनं नुकत्याच केलेल्या टोलविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज काय बोलणार याची सा-यांना उत्सुकता होती. पण आपल्या संपूर्ण भाषणात त्यांनी राजकीय भाष्य करणं टाळलं. त्यामुळे आता ९ तारखेला राज काय बोलणार याची सर्वांना उत्सुकता लागलीय. ज्येष्ठ लेखक अरुण साधू तसेच दिग्दर्शक जब्बार पटेलही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ