सेनेला सोबत घेतल्याशिवाय भाजपकडे पर्याय नाही – रामदास आठवले

 झाले गेले विसरून जावे, असे म्हणत मत रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. 

Updated: Oct 24, 2014, 04:27 PM IST
सेनेला सोबत घेतल्याशिवाय भाजपकडे पर्याय नाही – रामदास आठवले title=

मुंबई :  झाले गेले विसरून जावे, असे म्हणत मत रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. 

दिवाळीनिमित्त भेट घेतल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले, की सत्तास्थापनेसाठी शिवसेनेसोबत एकत्र आल्यावाचून भाजपकडे पर्याय नाही. सत्ता स्थापनेसाठी भाजपला शिवसेनेचा पाठिंबा घ्यावाच लागेल.

जनतेनं दोन्ही पक्षांना कौल दिला आहे. दोन्ही पक्षांनी एकत्र आल्यास सत्ता स्थापन होणार आहे. त्यामुळे शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय भाजपला पर्याय नसल्याचंही आठवले यांनी सांगितलं.
 
उद्धव ठाकरे यांच्या भेटीत सत्तास्थापनेबाबतही चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपसोबत जाण्याबाबत आपल्याला कोणतीही अडचण नाही. दिवाळी झाल्यानंतर सत्तास्थापनेबाबत भाजपशी चर्चा करू अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दिल्याचंही आठवले यांनी सांगितलं.

यावेळी, रिपाइंला दोन मंत्रीपदे मिळावी असा पुनर्रुच्चार आठवले यांनी केला.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.