निवासी डॉक्टर्सच्या संपामुळे रुग्णांचे हाल

डॉक्टरांचा संपाचा चौथा दिवस आहे. रुग्णसेवा पूर्णत: कोलमडली आहे. खासगी डॉक्टरांचाही संपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 23, 2017, 10:34 AM IST
निवासी डॉक्टर्सच्या संपामुळे रुग्णांचे हाल title=

मुंबई : डॉक्टरांचा संपाचा चौथा दिवस आहे. रुग्णसेवा पूर्णत: कोलमडली आहे. खासगी डॉक्टरांचाही संपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. दरम्यान, डॉक्टर्सनी संप मागे घेतल्याचा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांचा दावा फोल ठरला आहे.

निवासी डॉक्टर्सच्या संपामुळे रुग्णांचे हाल होत आहे. नागपूर, सोलापुरात संपकरी डॉक्टरांचं निलंबन करण्यात आले आहे. तर नागपूरमध्ये सुरक्षा रक्षकाला रूग्णाच्या नातेवाईकांची मारहाण केली तर सायन मध्येही महिला डॉक्टरला मारहाण केल्यात आली आहे. त्यामुळे संप अधिकच चिघळण्यास मदत झाली आहे.

निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतल्याचा दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केला. निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डच्या पदाधिका-यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्याचा दावा महाजनांनी केला. मार्डच्या मागण्या मान्य केल्या असून त्यासंदर्भात तातडीनं अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिल्यानंतर निवासी डॉक्टर कामावर रुजू होणार असल्याचा दावा महाजनांनी केला. 

मार्डच्या डॉक्टरांनी संप मागे घेतल्याचा सरकारचा दावा आयएमए अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशननं फेटाळून लावलाय. मार्डशी आपलं बोलणं झालं असून त्यांनी संप मागे घेतला नसल्याचं आयएमएचे अध्यक्ष अशोक तांबे यांनी झी 24 तासला सांगितलंय. विशेष म्हणजे आता खासगी डॉक्टरांनीही मार्डच्या आंदोलनाला समर्थन देण्याचा निर्णय़ घेतलाय. त्यामुळं राज्यातले तब्बल 40 हजार डॉक्टर संपावर जाणार आहेत. 

संपाचा फटका खासगी रुग्णालयांतील रुग्णांनाही बसणार आहे.  तसंच रेडिऑलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट संघटनेनंही या संपाला पाठिंबा दर्शवलाय. त्यामुळं राज्यातील वैद्यकीय सेवा ठप्प होण्याची शक्यता असून रूग्णांचे अधिकच हाल होणार असल्याचं दिसंतय. महाराष्ट्रात आयएमच्या 2206 शाखा आहेत.