मनसेची आज दुसरी बैठक, राज ठाकरे यांची उपस्थिती नाही!

काल चिंतन बैठकीत उमटलेले महापालिका निवडणुकीतील पराभवाचे पडसाद आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांडूनच होत असलेली नेते-सरचिटणीस फेरबदलाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मनसेची तातडीची बैठक होत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होणार याची उत्सुकता आहे. दरम्यान, अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित राहणार नाहीत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 22, 2017, 12:26 PM IST
 मनसेची आज दुसरी बैठक, राज ठाकरे यांची उपस्थिती नाही! title=

मुंबई : काल चिंतन बैठकीत उमटलेले महापालिका निवडणुकीतील पराभवाचे पडसाद आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांडूनच होत असलेली नेते-सरचिटणीस फेरबदलाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मनसेची तातडीची बैठक होत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होणार याची उत्सुकता आहे. दरम्यान, अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होणार याची उत्सुकता आहे.

चिंतन बैठकीत नेते आणि सरचिटणीस यांनी राज ठाकरेंसमोर काही प्रश्न उपस्थित केले. यावेळी चिंतन बैठकीत उमटलेले महापालिका निवडणुकीतील पराभवाचे पडसाद आणि त्यानंतर पक्षातील पदाधिकाऱ्यांडूनच होत असलेली नेते-सरचिटणीस फेरबदलाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा तातडीनं महत्वाची बैठक बोलावली आहे. पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय 'राजगड'वर ही बैठक होत आहे.

आजच्या बैठकीत आधी नेते-सरचिटणीस आणि नंतर विभाग अध्यक्षांशी राज ठाकरे संवाद साधणार आहेत. गेल्या दोन दिवसांत पक्षांतर्गत झालेल्या घडामोडींमुळे मनसे पुन्हा चर्चेत आलीय. 'कृष्णकुंज' आयोजित बैठकीत राज ठाकरे विरुद्ध नेते- सरचिटणीस अशी खडाजंगी झाली होती. 

महापलिका निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाचे खापर एकमेकांवर फोडण्याचा प्रयत्न झाला होता. तर पक्षाचे प्रवक्ते, माजी नगरसेवक संदीप देशपांडे आणि मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी नेते-सरचिटणीस फेरबद्लाची मागणी राज ठाकरे यांच्याकडे काल केलीय.

देशपांडे आणि खोपकर यांनी ट्विटर द्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या, ज्याला पक्षातील कार्यकर्त्यांकडून तितकाच उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे राज ठाकरे पक्षात अचानक उदभवलेली ही परिस्थिती कशी हाताळतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.