शेअर बाजारातील चढउतारामुळे गुंतवणुकदारांमध्ये संभ्रम

सोमवारच्या तूफान पडझडीनंतर आज सकाळी सावरलेल्या भारतीय शेअर बाजारांमध्ये पुन्हा एकदा विक्रीचा मारा सुरू झालाय. सकाळच्या वेळात सव्वाशे ते दीडशे अंशांनी वर असलेला सेन्सेक्स 11 ते साडेआकराच्या सुमारास जोरदार पडला.  त्यामुळे बाजारात संभ्रम आहे.

Updated: Aug 25, 2015, 12:21 PM IST
शेअर बाजारातील चढउतारामुळे गुंतवणुकदारांमध्ये संभ्रम title=

मुंबई : सोमवारच्या तूफान पडझडीनंतर आज सकाळी सावरलेल्या भारतीय शेअर बाजारांमध्ये पुन्हा एकदा विक्रीचा मारा सुरू झालाय. सकाळच्या वेळात सव्वाशे ते दीडशे अंशांनी वर असलेला सेन्सेक्स 11 ते साडेआकराच्या सुमारास जोरदार पडला.  त्यामुळे बाजारात संभ्रम आहे.

राष्ट्रीय शेअऱ बाजाराचा निफ्टीदेखील आदळला. ग्राहकोपयोगी वस्तू, बँका, सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या, ऊर्जा, इन्फ्रा या क्षेत्रांना या विक्रीचा सर्वाधिक मारा सहन करावा लागतोय. बाजारात होत असलेल्या जबरदस्त चढउतारामुळे गुंतवणुकदारांमध्ये सध्या संभ्रमाचं वातावरण आहे.

शेअर बाजार सावरत असल्याचं चित्र असल्यामुळे काहीसं आश्वस्त वाटत असतानाच अचानक बाजार कोसळल्यामुळे पुन्हा एकदा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवसांत सेन्सेक्समध्ये तब्बल 2 हजार अंशांची घट झाल्यामुळे गुंतवणूदार धास्तावले आहेत. अशा स्थितीत RBI गव्हर्नर आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दाखवलेला आत्मविश्वास गुंतवणुकदारांच्या पचनी पडणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.