मुंबई : महानगर पालिका निवडणुकीची रणधुमाळी प्रचाराने आजपासून रंगू लागली आहे. राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मानखुर्दपासून सुरु झाला. यावेळी पवार यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला. त्याचवेळी शिवसेनेला टार्गेट केले. या दोघांची पालिकेत सत्ता आहे. मात्र, मुंबईकरांच्या समस्या कायम आहे. त्यांना दूर करा, असे आवाहन पवार यांनी मतदारांना केले.
देशाचे चित्र बदल आहे. राजकारण बदलल आहे. मुंबई सारख्या शहरामध्ये कष्टकरी आणि कामगारांच आयुष्य उध्वस्त झाले आहे. देशाच्या काना कोपऱ्यात आज लोक अस्वस्थ आहेत. ज्या राज्यामध्ये आता निवडणुका झाल्या आहेत तिथे भाजपाचा शंभर टक्के पराभव होणार आहे, असे इशारा भाजपला पवार यांनी दिला.
मुंबईत खड्यांची भीषण समस्या आहे.नवी मुंबई, पिंपरी चिंचवड़, पुणे इथे आमची सत्ता आहे. इथला कारभार पाहा.नवी मुंबईत पिण्याच पाणी स्वछता याबद्दल जी काळजी घेतली जाते, त्याच्या 50% ही काळजी मुंबईत घेतली जात नाही.25 वर्ष सेनेच्या हातामध्ये सत्ता आहे. तरी स्वछ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नाहीत. मुख्यमंत्री सांगतात महानगर पालिकेमध्ये भ्रष्टचार आहे. मग तुम्हीपण सेनेसोबत 25 वर्ष मांडीला मांडी लावून बसला होतात. या दोघांनाही सत्तेपासून दूर करा. भाजपाने एक मशीन काढले आहे. जे गुंड आहेत ते भाजपमध्ये येवून पवित्र होतातेय. अनेक गुन्हे असणारी लोक भाजपमध्ये येत आहेत. त्यांचे स्वागत होत आहे, ही गंभीर बाब आहे, असे पवार म्हणालेत.
मुंबईत परिवर्तनाशिवाय पर्याय नाही आणि हे परिवर्तन राष्ट्रवादी करणार. मराठी माणसाचे हित जपले पाहिजेच पण मुंबईमध्ये येवून मुंबईच्या समृद्धीमध्ये भर घालणाऱ्या कष्ट करणाऱ्याच ही हित जपले पाहिजे. नोटबंदी वरुन मोदी यांच्यावर टिका.11 कोटी लोक मोदींमुळे रांगेत उभे राहिले. कितेकिकोटींचा रोजगार त्यांचा बुडला. नोटबंदीमुळे अनेक गरीब लोक, शेतकरी, लघु उद्योगामध्ये काम करणाऱ्या लोकांना कष्ट करणाऱ्याना फटका बसला. रांगेत टाटा, अंबानी नव्हते तर सर्व सामान्य गरीब माणूस उभा होता, अशी टीका पवार यांनी यावेळी केली.
मुंबई म्हणजे मिनी इंडिया आहे. इथला निकालचा संदेश सबंध देशामध्ये जातो. आपल्या देशाची बिघडलेली घडी ठीक करण्याच काम ही घडी(NCP)करणार आहे. ज्या पद्धतीने नव्या मुंबईचा चेहरा बदलला त्याच पद्धतीने मुंबईचा चेहरा बदलणार, असे आश्वासन पवार यांनी यावेळी मुंबईकरांना दिले.