मुंबई : शिवसेना एवढी लाचार होऊ शकते याची मी कल्पना करू शकत नाही, अशी कडाडून टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली.
या परिस्थिती आताची शिवसेनेच्या नेत्यांची वागणूक, दिल्ली वाऱ्या, गुडगे टेकायचे प्रसंग जे काही भाष्य करतात सरकारमध्ये जाण्यासाठी, मंत्रीपद मिळविण्यासाठी ही अत्यंत केविलवाणी स्थिती आहे. जर आता साहेब असते तर या सर्वांवर लाथ मारली असती आणि म्हणाले असते विरोधी पक्षात बसू या, अशी जळजळीत टीका नारायण राणे यांनी केली.
बाळासाहेबांनी स्वाभीमान शिकवला. पण त्यांचा मुलगा स्वाभीमान गुंडाळून ठेवून लाचारी पत्करत आहे. वैयक्तीक स्वार्थासाठी आणि काही जण आता सत्तेसाठी शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यांना पद देण्यासाठी हे केले जात आहे, असं माझं मत असल्याचे राणे यांनी सांगितले.
शिवसेना सत्तेत जरी आली तरी प्रभावीपणे काम करू शकेल, असे मला वाटत नाही. ज्याला अनुभव आहे, उत्तम प्रशासक आहे असा एकही माणूस शिवसेनेत नाही. जो काही सत्तेत सामील होण्याचा प्रयत्न होत आहे. तो केविलवाणा आणि लाजीरवाणा असल्याचे मत नारायण राणे यांनी व्यक्त केले.
आता यापुढे स्वाभीमानाच्या गोष्टी शिवसेनेने करू नये, अशीही टीका त्यांनी यावेळी केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.