हिवाळी अधिवेशनात शिवसेना विरोधी पक्षच - संजय राऊत

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेऊ, असं भाजपाचे नेते सांगत असले तरी शिवसेना नेत्यांनी भाजपासोबत जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत. आगामी हिवाळी अधिवेशनात शिवसेना प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका निभावत सरकारला धारेवर धरेल असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. 

PTI | Updated: Nov 23, 2014, 10:17 PM IST
हिवाळी अधिवेशनात शिवसेना विरोधी पक्षच - संजय राऊत title=

नवी दिल्ली: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेऊ, असं भाजपाचे नेते सांगत असले तरी शिवसेना नेत्यांनी भाजपासोबत जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत. आगामी हिवाळी अधिवेशनात शिवसेना प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका निभावत सरकारला धारेवर धरेल असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. 

हिवाळी अधिवेशनापूर्वी शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं भाजपाच्या नेत्यांनी सांगितलं होतं. रविवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी वृत्तसंस्थेला मुलाखत दिली असून यात त्यांनी भाजपासोबत जाणार नसल्याचे संकेतच दिले. 'शिवसेना आणि भाजपामध्ये चर्चा सुरु असल्याची माहिती नसून आता आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे हे राज्याचा दौरा करत असून विविध प्रश्नांवरुन सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत, असं राऊत यांनी नमूद केलं. शिवसेनेनं सत्तेत सहभागी व्हायचं की नाही याचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेतील असंही त्यांनी सांगितलं. 

केंद्रात भाजपाच्या अजेंड्याला पाठिंबा

संसदेच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त रविवारी दिल्लीत केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत संजय राऊत सहभागी झाले होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील मतभेदाचे परिणाम केंद्रावर होणार नाही. केंद्रात आम्ही भाजपाच्या अजेंड्यालाच पाठिंबा देऊ.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.