मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची तयारी सुरु

राज्यातील दहा महपालिका निवडणुकीनंतर आता सहा महिन्यांनी मीरा-भाईंदर महापालिकेची निवडणुक होणार आहे. त्यासाठी शिवसेनेनं आता पासूनच तयारी सुरू केली आहे. 

Updated: Mar 19, 2017, 05:03 PM IST
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची तयारी सुरु title=

मीरा-भाईंदर : राज्यातील दहा महपालिका निवडणुकीनंतर आता सहा महिन्यांनी मीरा-भाईंदर महापालिकेची निवडणुक होणार आहे. त्यासाठी शिवसेनेनं आता पासूनच तयारी सुरू केली आहे. 

मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि मनसेचा एक असे पाच नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. 

पण मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप सोबत युती करणार का, या प्रश्नावर अजून निर्णय झालेला नाही आहे, असं शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय.