भूकंपाचा परिणाम वज्रेश्वरी कुंडाच्या गरम पाण्याच्या झऱ्यांवरही

नेपाळमधल्या भूकंपाचे मुंबईत धक्के जाणवले नसले तरी या भूकंपाचा प्रभाव मुंबईवर झाला आहे. हा निव्वळ दावा नाही त्याला वैज्ञानिक आधार आहे. मुंबईपासून जवळच असलेल्या वज्रेश्वरी इथल्या गरम पाण्याच्या कुंडाच्या पाण्याचं तापमान अचानक वाढलंय.  

Updated: Apr 29, 2015, 01:06 PM IST
भूकंपाचा परिणाम वज्रेश्वरी कुंडाच्या गरम पाण्याच्या झऱ्यांवरही title=

मुंबई: नेपाळमधल्या भूकंपाचे मुंबईत धक्के जाणवले नसले तरी या भूकंपाचा प्रभाव मुंबईवर झाला आहे. हा निव्वळ दावा नाही त्याला वैज्ञानिक आधार आहे. मुंबईपासून जवळच असलेल्या वज्रेश्वरी इथल्या गरम पाण्याच्या कुंडाच्या पाण्याचं तापमान अचानक वाढलंय.  

या गोष्टीवर लगेच विश्वास बसणं शक्य नाही. त्यामुळे याबाबत सत्य तपासण्यासाठी आम्ही पोहोचलो मुंबई अहमदाबाद हायवेवर असलेल्या वज्रेश्वरी इथे... वज्रेश्वरी मंदिराचा उल्लेख पुराणातही आढळतो. या मंदिरानं अनेक रहस्य आपल्या उदरात घेतली आहेत. मंदिराच्या जवळच गरम पाण्याची कुंड आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार नेपाळ भूकंपानंतर पाण्याचं तापमान अचानक वाढलंय. या कुंडात उठलेल्या बुडबुड्यांकडे पाहून याची साक्ष पटेल.

मात्र दाव्यांवर विश्वास ठेवणं शक्य नाही. म्हणून आम्ही पोहोचलो कुंडांवर... तानसा नदीच्या किनाऱ्यावर गरम पाण्याची सात कुंड आहेत. त्या कुंडातलं पाण्याचं तापमान नेहमीपेक्षा जास्त गरम असल्याचं आढळून आलंय. भाविक या कुंडात उतरून स्नान करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून इथे कुंडात उतरून स्नान करणं शक्य झालेलं नाही. 

मात्र स्थानिकांचे दावे ऐकल्यावर आम्ही गाठलं या विषयातल्या तज्ज्ञांना. या संपूर्ण प्रकाराचा सखोल शोध घेणं आम्हाला गरजेचं वाटलं... त्यामुळे आ्म्ही पोहोचलो वज्रेश्वरीच्या जवळ असलेल्या निंबोली या गावात. इथेही एक जलस्त्रोत आहे. इथे या जलस्त्रोताचं तापमानही वाढलेलं आढळलं. आम्ही एका पुरचुंडीत थोडे तांदुळ घेतले. तेही या पाण्यात शिजल्याचं आढळलं

वज्रेश्वरीच्या कुंडातल्या पाण्याचं तापमान वाढलंय. पर्यावरण प्रेमींच्या आणि अभ्यासकांच्या मते हा नेपाळमधल्या भूकंपाचा परिणाम आहे. आगामी संकटाची चाहूल निसर्ग देत असतो. अर्थात निसर्गाचे हे इशारे समजून घेण्याची मानवाची इच्छा किती आहे हे महत्त्वाचं...

पाहा व्हिडिओ-

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.