मृत जिमी सिंहीण राणीच्या बागेत पुन्हा दिसणार!

भायखळ्यातल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यातनातील मृत पावलेली एकमेव सिंहीण जिमी पुन्हा पर्यटकांना दिसणार आहे. बोरिवली नॅशनपार्कमधली मृत शोभा या सिंहीणीचंही दर्शन पर्यटकांना पु्न्हा होणार आहे.  चक्रावलात ना... पण, हे साध्य होतंय 'टॅक्सीडर्मी' या तंत्रज्ञानामुळे...

Updated: Apr 12, 2015, 07:48 PM IST
मृत जिमी सिंहीण राणीच्या बागेत पुन्हा दिसणार! title=

मुंबई : भायखळ्यातल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यातनातील मृत पावलेली एकमेव सिंहीण जिमी पुन्हा पर्यटकांना दिसणार आहे. बोरिवली नॅशनपार्कमधली मृत शोभा या सिंहीणीचंही दर्शन पर्यटकांना पु्न्हा होणार आहे.  चक्रावलात ना... पण, हे साध्य होतंय 'टॅक्सीडर्मी' या तंत्रज्ञानामुळे...

बच्चे कंपनीचं प्राणी संग्रहालयातील खास आकर्षण म्हणजे वाघ सिंह... हे वाघ सिंहच जर प्राणी संग्रहालयातून दिसेनासे झाले तर प्राणिग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांची संख्याही रोडावते. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील एकमेव सिंहिण जिमीच्या मृत्यूनंतर उद्यानातील पर्यटकांचे उरलं-सुरलं आकर्षणही हरवलं. बोरिवली नॅशनल पार्कमध्येही असंच काहीसं झालं.  इथली शोभा नावाच्या सिंहीणीचा मृत्यू झाला आणि पर्यटकांनी नॅशनल पार्ककडे पाठ फिरवली. मात्र, आता पर्यटकांना या दोन्ही सिंहिणिंचं दर्शन घडणार आहे... आणि तेही अगदी जवळून. हे शक्य झालंय ऑक्सीडर्मी या तंत्रज्ञानामुळे... 

मरण पावलेल्या प्राणी-पक्ष्यांचे जतन करण्याचे काम बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीव जतन केंद्रात जोरात सुरू आहे, अशी माहिती टॅक्सीडर्मीस्ट डॉ. संतोष गायकवाड यांनी दिलीय.  

२००९ साली  बोरिवली नॅशनलपार्कमध्ये देशातलं हे एकमेव जतन केंद्र उभारण्यात आलं. देशभरातील मृत प्राण्यांना टॅक्सीडर्मी तंत्रज्ञानाच्या आधारे पुनरुज्जीवीत करण्याचं काम इथं होतं. प्राणी संग्रहालयातील मृत पावलेल्या चॉकलेटी घुबड, चंदेरी तितर आणि हिमालयीन अस्वलांच्या शरिरांचं जतनही या तंत्रज्ञानामुळे शक्य झालंय.
 
वनविभागानं आकारानुसार टॅक्सीडर्मीचे दर ठरवलेत. हत्ती, गेंडा अशा मोठ्या प्राण्यांसाठी ८० हजार वाघ, सिंह अशा मध्यम आकाराच्या प्राण्यांसाठी ५० हजार रुपये तर लांडगे हरिण अशा लहान आकाराच्या प्राण्यांसाठी २५ हजार असे दर ठरवण्यात आलेत. तेव्हा आता पुढच्या पिढीलाही लुप्त होत चाललेल्या जिवांची ओळख करुन देणं सहज शक्य होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.